लातूरमधील धक्कादायक घटना
लातूर,
लातूरमधील एमआयडीसी परिसरातील जेएसपीएम संस्थेच्या वसतीगृहात सुमारे ४२० विद्यार्थी राहतात. लातूर महापालिकेने या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली होती. या तपासणीत ४० विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची एकच धावपळ उडाली. या सर्व विद्यार्थ्यांना १२ नं पाटी येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट वाढत असतानाच येथील एका वसतीगृहातील ४० विद्यार्थींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे विद्यार्थी वेगवेगळ्या भागातून लातूरला शिक्षणासाठी आले आहेत. त्याशिवाय ते शिकत असलेल्या ठिकाणी ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, तसेच ते कोठे कोठे गेले होते, याची माहिती घेण्यात येत आहे.