कुख्यात गँगस्टर रवी पुजारीची कोठडीत रवानगी

    दिनांक :23-Feb-2021
|

ravi _1  H x W: 
मुंबई,
मुंबई पोलिसांनी कुख्यात गॅंगस्टर रवी पुजारी याचा कर्नाटक पोलिसांकडून ताबा घेतला आहे. त्याला आता मुंबईत आणण्यात आले आहे. मंगळवारी गँगस्टर रवी पुजारी याला मकोका कोर्टात हजर करण्यात आले आहे. मोक्का कोर्टाकडून मुंबई पोलिसांनी पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती. त्याला आता न्यायालयाने 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बंगलोर, मंगलोर सह इतर ठिकाणी रवी पुजारीवर दाखल गुन्ह्यांवर त्या ठिकाणी खटला चालवला जात होता. मुंबई पोलिसांना तब्बल 49 गुन्ह्यांमध्ये हवा असलेला रवी पुजारी याच्या ताब्यासाठी मुंबई पोलिसांकडून कर्नाटक राज्यातील न्यायालयाकडे पाठपुरावा केला जात होता. कर्नाटक न्यायालयाकडून तशा प्रकारची परवानगी मिळाल्यानंतर रवी पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळाला आहे.