अखेर संजय राठोडांनी सोडले मौन

    दिनांक :23-Feb-2021
|
 मुंबई,
पूजा चव्हाण प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड  मौन धारण करत
सार्वजनिक जीवनापासून दूर होते. १५ दिवसानंतर याप्रकरणी अखेर राठोडांनी  मौन सोडले आहे. आज पोहरादेवी सहकुटुंब जगदंबा मातेचं त्यांनी दर्शन घेतलं .
 

wagh 132335_1   
 
पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख आहे . तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि माझा समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. याप्रकरणात माझं राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न झालेला आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझी आणि समाजाबद्दल घाणेरड राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असं म्हणत संजय राठोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.