पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरु

    दिनांक :23-Feb-2021
|

pet _1  H x W:
 
- प्रती लिटर 35 पैशांनी वाढ 
मुंबई,
सलग 12 दिवसांच्या इंधन दरवाढी नंतर दोन दिवस पेट्रोल, डिझेलचे दर वाढले नव्हते. मात्र दोन दिवसांनंतर आज पुन्हा दरवाढीचे सत्र सुरु झाल्याचे दिसून आले.  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रती लिटर 35 पैशांनी वाढ झाली आहे.  9 फेब्रुवारीपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढू लागल्या. 8 फेब्रुवारीपर्यंत राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 86.95 रुपये होती तर डिझेलची किंमत 77.13 रुपये होती. पण आज 23 फेब्रुवारी 2021 रोजी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 90.97 रुपये आणि डिझेलची किंमत 81.36 रुपये आहे. म्हणजेच 15 दिवसातच दिल्लीत एक लिटर पेट्रोल 3.98 रुपये आणि डिझेल 4.19 रुपयांनी महागले आहे.