तापसी दिसणार दमदार भूमिकेत

    दिनांक :23-Feb-2021
|
मुंबई,
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने  अनुराग कश्यपच्या आगामी चित्रपटाच्य़ा शुटिंगला सुरुवात केली आहे. बातमीनुसार, तापसी एका पोलिसांची भूमिका साकारताना दिसणार आहे, तर 'वो लाडकी है कहां' चित्रपटात प्रतीक गांधीदेखील झळकणार आहे. सिद्धार्थ रॉय कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक अर्शद सय्यद करणार आहे. 'वो लडकी है कहां' या आगामी चित्रपटामध्ये ती दिसणार असून यामध्ये २०२० चा लोकप्रिय स्टार प्रतीक गांधीदेखील दिसणार आहे. नुकतीच तापसीने आपल्या इंटरेस्टींग चित्रपटांपैकी नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. 
 
tap _1  H x W:
 
दरम्यान, पन्नूने दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या आगामी थ्रिलर 'दोबारा'च्या शूटिंगला सुरुवात केली आहे. 'दोबारा'ची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्म्स अंतर्गत कल्ट मुव्हीज आणि सुनीर खेतेरपालसह अथेना आणि गौरव बोस यांच्या 'व्हर्मिलियन वर्ल्ड प्रॉडक्शन'च्या वतीने केली जात आहे.या चित्रपटाबद्दल बोलताना तापसी म्हणाली, “सिदसारख्या निर्मात्याबरोबर भागीदार होण्यामुळे आणि स्कॅम 1992 या गाजलेल्या वेब सिरीजमधील प्रतीक गांधी यांच्या भूमिकेमुळे मी प्रभावित झाले आहे.