पर्सेव्हरन्स रोव्हरचा मंगळावरील लँडिंग व्हिडीओ

    दिनांक :23-Feb-2021
|
- नासा केला शेअर
वॊशिंग्टन, 
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने मंगळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. नासाच्या पर्सेव्हरन्स रोव्हरने हा व्हिडीओ मंगळ ग्रहावरुन पाठवला आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावर कसे उतरले याची प्रत्येक सेकंदाची हालचाल या व्हिडीओत दिसत आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर मंगळावरील लाल जमिनीवरचं लँडिंगचा क्षण नासाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पर्सेव्हरन्स रोव्हर सात महिन्यांनंतर 19 फेब्रुवारी रोजी मंगळावर यशस्वीरित्या लँड करण्यात आले होते.  नासाच्या इंजिनीअर्सनी पहिल्यांदा पर्सेव्हरन्स रोव्हरने पाठवलेला मंगळ ग्रहावरील आवाज ऐकला आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की हा 10 सेकंदाचा ऑडिओ मंगळावरील हवेच्या आवाजाचा आहे. पर्सिवियरेंस रोव्हरवरील मायक्रोफोनने हा आवाज कॅप्चर केला आणि आम्हाला पाठवला.
nasa _1  H x W:
 
25 कॅमेरे लावण्यात आले
व्हिडीओतील दृष्यांवर नजर टाकल्यास मंगळ ग्रहावर मोठं वाळवंट असल्याचं दिसते. पर्सेव्हरन्स रोव्हर जसेजसे मंगळाच्या पृष्ठभागाजवळ जात होते तसे जेटमधून निघणाऱ्या वाऱ्यामुळे पृष्ठभागावरील माती वेगाने उडण्यास सुरुवात झाली. मंगळाच्या पृष्ठभागापासून 20 मीटर उंचीवर असतानाचा हा व्हिडिओ आहे. पृष्ठभागाच्या जवळ पोहोचताच रोव्हरची आठ चाके उघडण्यास सुरुवात होते आणि काही सेकंदात रोव्हर मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले. पर्सेव्हरन्स रोव्हरवर वेगवेगळे एकूण 25 कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या सर्व कॅमेऱ्यांनी मंगळ ग्रहावरील विविध फोटो कैद केले आहेत.