पुसदला बँकेसमोरून 5 लाखांची बॅग उडवली

    दिनांक :26-Feb-2021
Total Views |
पुसद, 
येथील आयसीआयसीआय बँकमधून काढलेले 5 लाख रुपये दोन दुचाकी वाहनावरील भामट्यांनी उडवून नेल्याने येथे एकच खळबळ उडाली.
 

rob_1  H x W: 0 
 
येथील अडते किशोर तोष्णीवाल यांचे कर्मचारी श्रीरंग ढोकणे (वय 58) तोष्णीवाल यांच्या खात्यातून गुरुवार, 25 फेब‘ुवारी रोजी दुपारी 2 च्या दरम्यान आयसीआयसीआय बँकेतून 5 लाख रुपये विड्रॉल करून आपल्या दुचाकीच्या डिक्कीत बॅग ठेवत होते. या वेळी अचानक दोन दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांना, तुमचे पैसे पडले आहेत असे म्हणून त्यांचे लक्ष विचलित केले व काही कळायच्या आत 5 लाखांची बॅग पळविली.
 
 
 
या घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिस चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. सहाय्यक पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनीदेखील घटनेची पूर्ण माहिती घेऊन योग्य त्या सूचना दिल्या. दरम्यान, हे भामटे बँकेतही काही वेळ बसले होते, अशी माहिती मिळाली आहे.