वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

    दिनांक :04-Feb-2021
Total Views |
बल्लारपूर, 
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथील दत्तू मडावी याचा वाघाच्या हल्लयात मृत्यू झाल्याची घटना गुरूवार, ४ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. बुधवारपासून तो बेपत्ता होता. त्याचा शोध कुटुंबातील सदस्यांनी घेतला. पण, कुठेही तो मिळून आला नाही. गुरूवारी शोध घेत असताना त्याचा एक पाय तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. तर शरिराचा अन्य भाग काही अंतरावर मिळून आला.
 
 
van  adhikari _1 &nb
 
 
घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार मृतक दत्तू मडावी जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेले होते. सरपण गोळा करीत असताना त्याच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची बाब समोर आली आहे. मृतकाच्या कुटुंबियास तातडीची २५ हजार रूपयाची मदत दिली गेली. उर्वरित मदत देण्याचे आश्‍वासन वनाधिकार्‍यांनी दिले. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रविण विरूटकर व क्षेत्र सहाय्यक के. एस. पोडचेलवार यांनी भेट दिली. या परिसरात कॅमेरे ट्रॅप लावले गेले असून, ग्रामस्थांनी जंगलात जावू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.