नाचणीचे उत्तपम

    दिनांक :11-Mar-2021
|
साहित्य-
 • दीड वाटी नाचणीचे पीठ
 • तीन वाटी दोस्याचे पीठ
 • १ वाटी किसलेले गाजर
 • २  वाटी बारीक चिरलेला कांदा
 • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • तेल
 • मीठ (चवीनुसार)


nachni_1  H x W
 
 कृती-
 • एका भांड्यात सर्व साहित्य एकत्र करावे.
 • घोळ तयार करून घ्यावा.
 • नॉनस्टिक तवा गरम झाल्यानंतर त्याला थोडे तेल लावावे.
 • डोश्या प्रमाणे घोळ तव्यावर टाकावा.
 • अतिशय पौष्टिक आणि झटपट होणारे नाचणीचे उत्तपम तयार...
 टिप- 
हे नाचणीचे उत्तपम नारळाच्या किंवा इतर कोणत्याही चटणी सोबत सर्व्ह करावे.
 
- चारू चेंडके 
 ९९२२०३१६७