साहित्य-
- एक वाटी माखणा
- दोन चमचे तूप
- १० ते १५ काजू आणि बदामाचे काप
- दीड लिटर दूध
- साखर आवडीनुसार
- एक छोटा चमचा विलायची पूड व केशर
कृती-
- एक वाटी मखाणे अर्धे काप करून तुपात भाजून घ्यावे.
- त्या बरोबर १० ते १५ बदाम काजू ह्याचे काप करून तेही थोडे भाजून घ्यावे.
- त्यानंतर दिड लिटर दूध गरम करून त्यात हे सर्व घालून उकळी आणावी.
- त्यात अंदाजे साखर घालावी थोड विलायची केशर घालावे.
- साधारण ३० ते ३५ मिनटात खीर तयार होते.
टीप-
ज्यांना साखर नाही चालत त्यांनी शुगर फ्री घालावे.