'आठवा रंग प्रेमाचा' दाखवणार रिंकू

    दिनांक :18-Mar-2021
Total Views |
मुंबई,
आपल्या सौंदर्यानं आणि अदांनी प्रेक्षकांना मोहून टाकणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता प्रेक्षकांना आठवा रंग प्रेमाचा दाखवणार आहे. 'आठवा रंग प्रेमाचा' या चित्रपटाचे नाव सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आले आहे.

rinku_1  H x W:
आदिनाथ पिक्चर्स, राकेश राऊत प्रॉडक्शन्स आणि टॉप अँगल प्रॉडक्शनने "आठवा रंग प्रेमाचा" या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. समीर कर्णिक, राकेश राऊत आणि आशिष भालेराव या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शक खुशबू सिन्हा यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अभिनेते मकरंद देशपांडे, रिंकू राजगुरू यांच्या महत्त्वाच्या भूमिका असून विशाल आनंद हा नवा अभिनेता या चित्रपटातून पदार्पण करत आहे.
समीर कर्णिक यांनी "क्युं हो गया ना.." या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून छाप पाडली होती. त्यानंतर "यमला पगला दिवाना", "चार दिन की चांदनी", "हिरोज", "नन्हे जैसलमेर" अशा उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन समीर यांनी केलं आहे.