पौष्टिक उकडपेंडी
दिनांक :24-Mar-2021
|
साहित्य-
- २ वाटी कणिक
- १ वाटी नाचणीचं पीठ
- १ वाटी ज्वारीचं पीठ
- अर्धा वाटी मुगाचे पीठ
- १ स्वीट कॉर्नचे दाणे
- ३ चमचे दही
- पाणी गरजेनुसार
फोडणीसाठी साहित्य-
- तेल
- मोहरी
- जिरे व २ ते ३ हिरव्या मिरच्या एकत्र वाटून घ्याव्या
- हिंग
- गोड लिंब/ कढीपत्ता
- साखर चवीनुसार
- मीठ चवीनुसार
कृती-
- कढईमध्ये तेल गरम करून घ्यावे.
- मोहरी, जिरे व हिंग फोडणी द्यावी.
- यात सर्वे पीठ एकत्र करून घ्यावे.
- पीठ खमंग भाजल्यावर त्यात स्वीट कॉर्नचे दाणे घालावे.
- यात कोमट पाणी करून ते घालावे.
- नंतर दही टाकावे.
- जिरे शिव्या मिरचीचे वाटण यात टाकावे.
- चांगली वाफ आली की सर्व्ह करावे.
टीप-
- स्वीट कॉर्नचे दाणे उपलब्ध नसल्यास मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करू शकता.
- सर्व्ह करताना वरून बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालावे.