अकोला तापले, पारा 40.04 अंशावर

    दिनांक :27-Mar-2021
|
अकोला, 
गत आठवड्यात अवकाळी पावसाने कमी झालेले तापमान पुन्हा वाढायला सुरुवात झाली असून, शनिवार, 27 मार्च रोजी अकोल्याचे तापमान 40.04 अंश से. नोंदविण्यात आले, तर किमान तापमान 17.05 अंश इतके आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानात वाढ व्हायला सुरुवात झाली.
 
akola_1  H x W:
 
2 मार्च रोजी विदर्भात सर्वाधिक तापमान 39.05 अंश अकोल्यात नोंदविण्यात आले. त्यानंतर 7 मार्च रोजी पारा 40.01 अंशांवर पोहोचला. 17 मार्च रोजी 40.03 अंश इतके तापमान होते. त्यानंतर काही दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पारा घसरला. 23 मार्च रोजी 28.08 अंश इतका नोंदविला गेला. ढगाळ वातावरण निघून गेल्यानंतर पारा पुन्हा वाढत असून, शनिवारी 40.04 अंश से. तापमान नोंदविले गेले. विदर्भात सर्वाधिक तापमान चंद्रपूर येथे 41.02 अंश इतके नोंदविले गेले असून, त्या खालोखाल अकोल्याचे तापमान आहे. विदर्भातील उन्हाळा तसा प्रसिद्धच आहे. या काळात सर्वच जिल्ह्यांत तापमान वाढत राहते. त्याला आता सुरुवात झाली आहे. येथून पुढचे तीन महिने प्रखर उन्हाळ्याचे राहणार आहेत.