लसीकरणास चांगला प्रतिसाद

    दिनांक :27-Mar-2021
|
नागपूर, 
नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह शहरातही लसीकरणासाठी नागरिकांमध्ये उत्साह असून नागरिकांचा सहभाग अधिक वाढवण्यासाठी प्रशासनाकडूनही प्रयत्न सुरू आहेत.
 
ngp _1  H x W:
 
कोरोना प्रतिबंधक लसीकरण आता तिसèया टप्प्यात असून आधीच्या तुलनेत या तिसऱ्या टप्प्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. १६ जानेवारीपासून प्रारंभ झालेल्या लसीकरणात डॉक्टरांसह आरोग्य सेवकांना प्रथम प्राधान्य देण्यात आले. त्यांच्याकडून प्रारंभी मिळालेला प्रतिसाद फारसा नव्हता. पोलिसांसह फ्रंटलाईन वर्कर्सना लसीकरणासाठी दुसèया टप्प्यात तसेच १ मार्चपासून तिसऱ्या  टप्प्यात ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांंवरील मधुमेह, रक्तदाब आदी आजारी नागरिकांना लसीकरणात सहभागी करून घेण्यात आले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ६१ तसेच नागपूर शहरातील ७४ केंद्रांवर पहिल्या दिवसापासून ते आजही लसीकरणासाठी दिसणाऱ्या  ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा त्यांच्या लस टोचून घेण्यासाठी उत्साहाची साक्ष देतात. त्यांचा उत्साह पाहून दोन दिवसातच दोन पाळीत लसीकरण सुरू करण्यातआले आहे. त्यांचा उत्साह पाहता मागील आठवड्यांपासून एका पाळीत ५ हजारांना लसीकरण केले जाते. उपलब्ध माहितीनुसार शनिवारी, ग्रामीण भागात एकूण ११ हजार ५०० लक्ष्यांक होते. म्हणजे ११ हजार ५०० जणांना लसीकरण करायचे होते. प्रत्यक्षात ६३३६ नागरिक लसीकरणासाठी आले. पहिली मात्रा घेण्यासाठी १८२ आरोग्य सेवक, ७१२ फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील १२७० तसेच ४०५५ ज्येष्ठ नागरिक, दुसरी मात्रा घेण्यासाठी ३५ आरोग्य सेवक, ८२ फ्रंटलाईन वर्कर्स आले होते.