3 मृत्यूसह 223 बाधितांची नव्याने भर

    दिनांक :27-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, 
जिल्ह्यात मागील 24 तासात 103 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 223 बाधितांची नव्याने भर पडली असून, तिन जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 26 हजार 924 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 24 हजार 645 झाली आहे. सध्या 1859 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 2 लाख 68 हजार 393 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 2 लाख 36 हजार 611 नमुने नकारात्मक आले आहेत.

ch_1  H x W: 0  
 
मृतांमध्ये सिंदेवाही तालुक्यातील सावरगाव येथील 58 वर्षीय पुरूष, चंद्रपूर शहरातील 60 वर्षीय व 65 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 420 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 381, तेलंगणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा 1 आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. शनिवारी बाधित आलेल्या 223 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 72, चंद्रपूर तालुका 21, बल्लारपूर 14, भद्रावती 17, ब्रम्हपुरी सात, नागभीड 18, सिंदेवाही 4, मूल 10, सावली 2, पोंभुर्णा 1, गोंडपिपरी 1, राजुरा 9, चिमूर 11, वरोरा 25, कोरपना 5 व इतर ठिकाणच्या 6 रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात सार्‍याच तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला ही मानसिकता सोडावी आणि मुखाच्छादनाचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.