वनमंत्र्यांना पत्र देऊनही कारवाई नाही

    दिनांक :27-Mar-2021
|
- आ. राणा यांनी जाहीर केले पत्र
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या बदलीसाठी 20 ऑक्टोबर 2020 रोजी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र दिले होते. त्यांनी त्या पत्रावर काहीच कारवाई केली नाही, असे आ. रवी राणा यांनी सांगितले आहे.
 
am _1  H x W: 0
 
दीपाली यांनी माझ्याकडे व खासदारांकडे अनेकदा उपवनसंरक्षक शिवकुमार त्रास देत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. माझी इतरत्र बदली करण्यात यावी अशी मागणी सुध्दा त्यांनी केली होती. या संदर्भात मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांना वारंवार सांगितले. रेड्डी हे हलगर्जीपणा दाखवत असल्यामुळे वनमंत्री राठोड यांना पत्र दिले होते. दीपाली यांची इतरत्र बदली करावी आणि तसे शक्य नसल्यास शिवकुमार यांची तात्काळ बदली करण्याचे आदेश आपणाकडुन देण्यात यावे, अशी विनंती पत्रातून तेव्हा केल्याचे आ. राणा यांनी सांगितले. तेव्हाचे पत्रही त्यांनी जाहीर केले आहे.