समर्थ महाविद्यालय लाखनी माजी उपप्राचार्य, माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. राम आर्विकर यांचे निधन

    दिनांक :27-Mar-2021
|
 
 
bh _1  H x W: 0
 
भंडारा,  
स्थानिक लाखनी येथील समर्थ महाविद्यालय येथील माजी उपप्राचार्य आणि मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ राम आर्विकर यांचे कोरोना आजाराने नागपूर येथे खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक असून पी एच डी चे मार्गदर्शक होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिखाण केले होते. त्यांनी विदर्भ साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या सोबत अनेक साहित्य संमेलनात त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या मृत्यू समयी ते 63 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, एक मुलगी, जावई होते.