गहू खरेदी सुरू करा,अन्यथा आंदोलन

    दिनांक :27-Mar-2021
|
- आमदार सावरकरांचा इशारा
अकोला,
अतिवृष्टी व गारपिटीमुळे शेतकरी संकटात आहेत. अनेक शेतकर्‍यांचे गव्हाचे पीक हाती आले आहे. त्याची खरेदी शासनाने येत्या पाच दिवसात सुरू न केल्यास शेतकर्‍यांच्या हक्कासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिघाडी सरकारच्या विरोधात आपण रस्त्यावर उतरू असा इशारा अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आहे.
 
ak_1  H x W: 0
 
शेतकर्‍यांच्या पाठीशी असल्याचा दावा करणार्‍या काँग्रेस,राष्ट्रवादी सरकार शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून केवळ खंडणी वसुली करण्यात व्यस्त असून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना या सरकारकडून कोणतेच सहाय्य होत नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ताबडतोब मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांचा गहू खरेदी करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू करावे .शेतकरी संकटात असताना कोरोना संकटाच्या परिस्थितीचा गैरफायदा दलालांनी घेऊ नये यासाठी शासनाने पाच दिवसात गहू खरेदी केंद्र सुरू न केल्यास भाजपा आंदोलन उभारेल असेही ते म्हणाले.