सायन्सकोर मैदानाचे रूप पालटण्यास सुरुवात

    दिनांक :27-Mar-2021
|
- डॉ. सुनील देशमुखांच्या प्रयत्नांची फलश्रुती
तभा वृत्तसेवा
अमरावती,
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी बाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा दिग्गजांच्या लाखोंच्या ऐतिहासिक जाहीर सभांचा साक्षीदार असलेले विशाल, विस्तीर्ण आणि मध्यवस्तीत असलेले सायन्सकोर मैदान कात टाकून नव्या देखण्या रुपात सज्ज होत आहे.

am_1  H x W: 0  
 
डॉ. सुनील देशमुख यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने ऐतिहासिक सायन्सकोर मैदानाचे जतन व विकासाकरिता जिल्हा नियोजन समितीद्वारे 1 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वर्ष 2019-20 मध्ये मंजूर करण्यात आला होता. त्या अंतर्गत आता मैदानाचे रूप पालटणे सुरू झाले आहे. सायन्सकोर मैदानाला सर्व बाजूंनी सुरक्षा भिंत, दोन बाजूंनी भव्य प्रवेशद्वार, मैदानाच्या आंतमध्ये पेव्हींग ब्लॉक व लगतच मातीचा वॉकिंग ट्रॅक, या सारखी कामे मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर आहे. यामुळे ऐतिहासिक मैदानाचे जतन तर होणारच, सोबतच येथे वाढलेल्या असामाजिक तत्वांना, अनधिकृत धंद्यांना सुद्धा आळा घातल्या जाणार आहे. गत काळात सायन्सकोर मैदानाची अत्यंत दुरवस्था झाली होती. आता मैदानाला अत्यंत देखणे रुप प्राप्त होत आहे. या मैदानाच्या विकासासाठी सुनील देशमुख यांनी दीर्घ काळ संघर्ष चालविलेला आहे. आता मैदानाचे एकसारखे सपाटीकरण करण्यात आले आहे. वाकिंग ट्रॅकचे काम 50 टक्के पूर्ण झाले आहे. सुरक्षा भिंत व मुख्य प्रवेशद्वाराचे निर्माण कार्यसुद्धा झपाटयाने सुरु आहे. लवकरच हे मैदान सुंदर अशा स्वरुपात नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होईल