लखाड गावात एकाच दिवशी तीन चोर्‍या

    दिनांक :27-Mar-2021
|
- चड्डी बनीयन टोळी पुन्हा सक्रीय
तभा वृत्तसेवा
अंजनगाव सुर्जी,
अंजनगाव तालुक्यात लखाड गावात एकाच दिवशी तीन चोर्‍या झाल्याचे पोलिस ठाण्यातील तक्रारीवरून उघड झाले आहे. अशोक लक्ष्मणराव हिरे यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांच्या घरात रात्रीच्या सुमारास आज्ञात चोरांनी कपाट उघडून अंदाजे 15 हजार रुपये व 4 ग्रॅम सोन्याचे कानातले चोरीला गेल्याचे नमूद केले आहे.

am_1  H x W: 0  
 
तसेच शकिल खान तुकडू खान पठाण व अब्दुल नाजीम अ. साबीर यांच्या घरी देखील चोरी झाली. एस. एस. आर. पेट्रोल पंपावर असणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या आधारावर चोर जेरबंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र खुलेआम ते चोर लखाड परिसरात रात्रभर फिरत होते. रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाजाने चक्रधर लोखंडे उठले व आजूबाजूचा कानोसा घेतला. त्यानंतर बाहेरचा दरवाजा उघडला असता तीन आज्ञात व्यक्तींना पाहिले. यामध्ये एकाने हॉफप्यांट व बनियान घातली होती तर दोन लोकांच्या हातात लोखंडी पाईप होते. आज्ञात व्यक्तींना चाहूल लागताच त्यांनी लोखंडे यांनाच गोटा मारला. मात्र चोरी झाल्याची कसलीही कल्पना चक्रधर लोखंडे यांना नव्हती. त्यानंतर झालेल्या आरडाओरडीने गावात चोरी झाल्याचे त्यांना समजल्यावर तेच गोटे मारणारे आज्ञात इसम चोर असावे, असे त्यांनी पोलिस ठाण्यात सांगितले. पोलिस निरीक्षक राजेश राठोड तपास करीत आहेत.