वीज कनेक्शन नसतानाही 13 हजाराचे बिल

    दिनांक :28-Mar-2021
|
- महावितरणचा अजब कारभार
मंगरूळनाथ,  
तालुक्यातीह कोठारी येथील शेतकरी संदीप सुदाम इंगोले या शेतकर्‍याला महावितरण कंपनीने विजेचा शॉक दिला असून, वीज जोडणी नसतांनाही तब्बल 13 हजारच्या जवळपास वीज बिल दिले आहे. संदीप सुदाम इंगोलेने आपल्या शेतात विहीर खोदली असून, पीक लागवड करण्याच्या उद्देशाने त्यांनी 2014 मध्ये वीज जोडणीसाठी अर्ज केला होता व कोटेशनही भरले होते. परंतु अद्याप त्यांना वीजेची जोडणी मिळाली नाही. तरीही त्याचे बिल 13 हजार रुपये आले आहे. आलेले बिल पाहून संदीप सुदाम इंगोले यांनी ऑफिसमध्ये धाव घेतली. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकुण घेण्यात आल नाही.
 

maha _1  H x W:
 
शेतात वीज जोडणी नसतांना आलेल बिल कसे भरणार असा प्रश्‍न त्यांना पडला. महावितरण कंपनीकडे विचारणा केल्यानंतर सुध्दा समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने येत्या 7 दिवसा नंतर महावितरण कार्यालयाजवळ उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. महावितरण कंपनी कडुन चौकशी करुन पंचनामाही करण्यात आला आहे त्यामध्ये सदर शेतकर्‍यास वीजेची जोडणी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लवकर वीज जोडणी न दिल्यास व संबंधितांवर कारवाई न केल्यास अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात परिवारसह उपोषणाचा इशारा दिला आहे.