नागपूर,
खंडीत केलेला वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचार्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लघुवेतन कॉलनी येथे राहणार्या कल्याण दामोधर सांगोळे याच्याकडे थकबाकी होती. काही दिवसांपूर्वी वीज कर्मचार्यांनी कल्याणच्या घरातील वीजपुरवठा खंडीत केला होता. कल्याणने काही थकबाकी भरली. शनिवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आलोक शिवाजी वाघ (34) हे आपल्या सहकार्यांसह वीजपुरवठा जोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी कल्याण व त्याच्या दोन साथीदारांनी आलोक यांना शिवीगाळ करून हातबुक्कीने मारहाण केली. त्याचप्रमाणे जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.