वारकऱ्यांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिराचे भूमिपूजन

    दिनांक :28-Mar-2021
|
- कुटासा अध्यात्मिक व सर्वांगीण विकास शिबिराचे उगमस्थान व्हावे - ह. भ. प.विठ्ठल महाराज साबळे
अकोला,
कुटासा येथील कै.रामकृष्ण आप्पाजी मिटकरी यांच्या समाधी स्थळाच्या बाजूला अध्यात्म व बाल संस्कार शिबिराचे उगमस्थान व्हावे या उद्देशाने विठ्ठल मंदिराचे निर्माण होणार असून त्याचा भूमिपूजन सोहळा वारकरी संप्रदायाची मंडळी व आमदार अमोल मिटकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी कुटासा येथे पार पडला.

akola_1  H x W: 
 
यावेळी टाळमृदुंगाच्या गजरात परिसर निनादून गेला होता कोरोनाच्या काळात पुरेशी काळजी घेत केवळ पंधरा लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.यावेळी सुश्राव्य भजन सोहळा यावेळी रंगला होता. कै. रामकृष्ण आप्पाजी मिटकरी हे आयुष्यभर एक वारकरी म्हणून जीवन जगलेत. विठ्ठलाच्या पायाशी कायम त्यांना चीर शांती लाभावी या उद्देशाने कुटासा येथे त्यांच्या स्मृतीस्थळी विठ्ठल मंदिराचे भूमिपूजन पार पडले. लवकरच येथे एक विठ्ठल मंदिर उभारल्या जाणार असल्याचे यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. या माध्यमातून या भागात बालसंस्कार सर्वांगीण विकास शिबिरे,अध्यात्मिक विकास यासारखे उपक्रम सुरू व्हावे अशी अपेक्षा यावेळी विठ्ठल महाराज साबळे यांनी व्यक्त केले.
 
तर शेत शिवारात फुललेले विठ्ठल मंदिर निश्चितच अध्यात्माचं केंद्र बनेल व या ठिकाणावरून भविष्यात विविध उपक्रम चालवल्या जातील असे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला हभप विठ्ठल महाराज साबळे,रतन महाराज वसू, विश्व वारकरी सेनेचे राज्यअध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे ,गजानन महाराज येरोकर,विलास कराड ,रविंद्र केंद्रे,रामकृष्ण आंबूस्कार,श्रीधर पातोंड, श्रीधर तळोकार,ज्ञानेश्वर महाराज जावरकर, विक्रम महाराज शेटे,ज्ञानेश्वर महाराज पातोंड,वैभव महाराज वसु,प्रकाश महाराज पांडे, सोपान महाराज काळुसे, संतोष महाराज घुगे, गजानन मोडक, सुभाष महाराज कावरे आदी उपस्थित होते.