दिलासादायक ३४७९ कोरोनामुक्ती

    दिनांक :28-Mar-2021
|
- मात्र ३७७० बाधितांची भर
नागपूर,
मागील २४ तासात नागपूर जिल्ह्यात ५८ बाधितांचा मृत्यू झाला असून दुसèया लाटेतील ही संख्या मुंबई-पुण्यापेक्षाही जास्त आहे. ३९७० बाधितांची भर पडली असली तरी ३४७९ ही कोरोनामुक्तांची संख्या दिलासा देणारी ठरली आहे. मागील २४ तासात नागपूर शहरात २९५०, ग्रामीण १०१७ व जिल्ह्याबाहेरील ३, असे एकूण ३९७० बाधित सकारात्मक निघाले. ग्रामीणमध्ये ४५०३५, शहरात १,७२,७६० तसेच जिल्ह्याबाहेरील १०२५, असे एकूण २ लाख १८ हजार ८२० बाधितांची संख्या झाली आहे.
 

ng_1  H x W: 0  
 
१६१५५ नमुन्यांच्या तपासणीत १२१८५ नमुने नकारात्मक आले. आरटीपीसीआर पद्धतीने १२९७१, रॅपिड अँटिजन पद्धतीने ३१८४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. मागील २४ तासात ग्रामीणमध्ये १८, शहरात ३७ तसेच जिल्ह्याबाहेरील ३, अशा ५८ बाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ९३५, शहरात ३१५३, जिल्ह्याबाहेरील ८४३, असे एकूण ४९३१ बाधितांच्या मृत्यूची संख्या झाली आहे. कोरोनाच्या दुसèया लाटेत महाराष्ट्रात नागपुरातील आजची मृत्यूसंख्या सर्वाधिक आहे. मागील २४ तासात ग्रामीणचे ६५५ व शहरी २८२४ असे एकूण ३४७९ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले. आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या असून गंभीर संकटात दिलासा देणारी ठरली आहे. आतापर्यंत १ लाख ७६ हजार ११३ कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे आजचे प्रमाण ८०.४८ टक्के आहे. ३७७७६ बाधितांपैकी ८८४६ रुग्णालयात तसेच २८९३० गृहविलगित आहेत.