संचारबंदीत जिल्हा चिडीचूप; वर्धेकर घरातच

    दिनांक :28-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
कोराना संक्रमन टाळण्यासाठी तसेच होळी आणि धुळवळीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात 60 तासाची संचारबंदी लावण्यात आली. या संचारबंदीला आज रविवारी वर्धेकरांनी उत्फुर्त प्रतिसाद देत घराबाहेर निघणार्‍या पावलांवर आवर घालत घराच्या अंगनातच होळीचा आनंद घेताना दिसून आले. अत्यावश्यक सेवा वगळता दिवसभर वर्ध्यातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.
 
wd_1  H x W: 0
 
होळी म्हटले की रंगोत्सव आनंद अन त्या पाठोपाठ घडणार्‍या हिंसेच्या घटना या आनंदात विरजन असं काहीच गेल्या काही वर्षात समीकरणच झाले आहे. गाव असो की शहर रंग लावल्याच्या, सुडबुद्धीच्या कारणातून अशा एक ना अनेक कारणाहून हिंसाचाराच्या घटना घडतात. जिल्ह्यात दारु बंदी असताना ग्रामीण तसेच शहरी भागात दारूची सर्रास विक्री होते. यात होळी अन पोळयाच्या पाडव्याला तर न विचारलेलेच बरे. जिल्ह्यालगत असलेल्या अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या पोलिस प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकून वाहतूक केली जाते. गेल्या काही वर्षात होणार्‍या हिंसेच्या घटना टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो. जिल्ह्यात शनिवार रविवार संचारबंदीवार गेल्या काही महिन्यांपासून झाला आहे. त्यात होळी सण हा रविवारला आल्याने प्रशानाच्या संचारबंदीत 24 तासाची वाढ करत 60 तासाची करण्यात आली. संचारबंदी असल्याने घराबाहेर पडण्याचे काही कारण उरत नाही. कारण काढून घराबाहेर पडले ही तरी उलंघण करणार्‍यावर दंडांत्मक कारवाई करण्यासाठी पथक नेमली आहे. तर अवैध दारु वाहतूक रोखण्यासाठी हिंसाचार्‍याच्या घटनेवर आवर घालण्यासाठी जिल्ह्यात पोलिस प्रशासन सज्ज आहे. यात पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, 3 उपविभागीय पोलिस अधिकारी, 35 पोलिस निरीक्षक, उपपोलिस निरीक्षक, 1 हजार 250 पोलिस कर्मचारी 500 गृहरक्षक, ज्यात 100 महिला गृहरक्षक असा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या असून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे, तसेच गस्तीवर पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त लावण्यात आला आहे. जिल्ह्यात आर्वी, आष्टी, समुद्रपूर, कारंजा, देवळी, पुलगाव, सेलू आदी ठिकाणीही आज संचारबंबी पाळण्यात आली. तळेगावमध्ये बंदच्या आदेशाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बसस्थानकावर थोडी गर्दी होती. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सकाळी 11 वाजताच्या सुमारास शहरात फेरफटका मारला. चौकाचौकात पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.