अमरावती जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता

    दिनांक :28-Mar-2021
|
- सकाळी 7 ते सांय. 6 पर्यंत दुकाने उघडी रहाणार
तभा वृत्तसेवा
अमरावती,
कोरोना प्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सुधारित आदेश आज जारी केला. या आदेशानुसार संचारबंदीत थोडी शिथिलता देण्यात आली आहे.
 
se_1  H x W: 0
 
आदेशानुसार, सर्वांना मास्क अनिवार्य करण्यात आला असून सुरक्षित अंतर सहा फुट ठेवणे आवश्यक आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी नाकरण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकल्यास 1 हजार दंड ठोठावण्यात येणार आहे. कार्यालयातील कर्मचार्‍यांना पाळीनिहाय कामावर बोलविण्याचे निर्देश आहे. कोरोना रुग्ण आढळल्यास त्याला 14 दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. पाचजणांना एकत्र येण्यावर बंदी टाकण्यात आली आहे. सर्व जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक साहित्याची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नियमित सुरू राहतील. त्याचप्रमाणे, हॉटेल, उपाहारगृहे 50 टक्के आसनक्षमतेत सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू राहतील. तथापि, सायंकाळी 7 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 7 या वेळेत खाद्य व उपाहारगृहांना पार्सल सेवा सुरू ठेवता येईल. चित्रपटगृहे व सर्व प्रकारच्या प्रेक्षागृहांना 50 प्रवेश मर्यादेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक स्थळी जास्त गर्दी होऊ न देण्याचे निर्देश देण्यात आले असून आभासी आरक्षण पध्दतीताचा अवलंब करण्याचे आदेश देण्यात आले आहे.