जास्त व्याजाचे आमिष दाखवून तरुणाला फसविले

    दिनांक :28-Mar-2021
|
नागपूर, 
शेअर्स योजनेत पैसे गुंतविल्यास जास्त व्याज देण्याचे आमिष दाखवून एका तरुणाची फसवणूक केल्याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी मो. इर्शाद रहमान सिद्दीकी (35) स्वागतनगर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
 
ngp_1  H x W: 0
 
मो. इर्शादचा प्लॉट खरेदी विक्रीचा व्यावसाय आहे. त्याची जुनी कामठी येथील चंपाश्रमजवळ राहणार्‍या मो. मुश्ताक अहमद (30) यांच्याशी ओळख होती. इर्शादने मुश्ताक यास ‘आम्ही एक योजना काढली आहे. तुम्ही शेअर्स घेतल्यास तीन वर्षात जास्त पैसे करून देतो’ असे आमिष दाखविले. 13 जानेवारी 2017 रोजी मुश्ताक इर्शादच्या योजनेत एक लाख रुपये गुंतवून शेअर्स खरेदी केले. 6 फेब्रुवारी 2021 रोजी शेअर्सची मुदत संपल्यानंतर मुश्ताकने मूळ रक्कम आणि व्याज असे 3 लाख 40 हजार रुपये इर्शादला मागितले. त्यावर इर्शादने खात्यात पैसे नसलेल्या बँकेचा धनादेश दिला. मुश्ताक तो धनादेश बँकेत टाकला असता पैसे नसल्याने धनादेश परत आला. पुन्हा इर्शादला पैसे मागितले असता त्याने मुश्ताक यास शिवीगाळ करीत पैसे परत करीत नाही असे म्हटले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच मुश्ताकने जुनी कामठी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.