बुलडाणा जिल्ह्यातील दुचाकी चोर हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :28-Mar-2021
|
हिवरखेड,
हिवरखेड पोलीस ठाण्यात असलेल्या दुचाकी चोरीच्या तक्रारीचा तपास करीत पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातील दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे.गाडी हस्तगत करून आरोपीला अटक केली, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
sdfs_1  H x W:
 
हिवरखेड पोलीस स्टेशन मधे 5 डिसेंबर 2020 रोजी आकोट तालुक्यातील नेहोरी येथील गोपाल गजानन वसू यांची दुचाकी दानापूर ते सौंदळा मार्गावरून चोरी गेली होती.त्याची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर हिवरखेड पोलिसांनी दुचाकी आणि आरोपीचा शोध घेणे सुरू केले 25 मार्च रोजी पोलीस कॉन्स्टेबल आकाश राठोड, प्रफुल पवार यांना मिळालेल्या माहिती वरून त्यांनी आरोपीचा शोध घेतला त्यात चोरी गेलेले वाहन आणि आरोपी याला वरवट बकाल तालुका संग्रामपूर येथून ताब्यात घेतले आणि वाहन जप्त केले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली ही कारवाई ठाणेदार धिरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संजय शास्त्री, आकाश राठोड, प्रफुल पवार यांनी केली.