श्री अंबा व एकविरा देवी मंदिरासमोर होळी दहन

    दिनांक :28-Mar-2021
|
 

am_1  H x W: 0  
 
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
अंबादेवी संस्थानच्यावतीने जवळपास दोनशे वर्षापासून मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर असलेल्या प्रांगणात होळी दहन होते. होळी पोर्णिमेच्या एक महिन्यापूर्वी येणार्‍या माघ पोर्णिमेला प्रांगणात हेट्याचे वाळलेले झाड रोवले जाते. परिसरातील भाविक त्या झाडाला नारळ व पूजा बांधून मनोकामना व्यक्त करतात. या होळीला श्रृंगार केला जातो. यंदा या होळीची पूजा किशोर बेंद्रे यांनी केली. यावेळी संस्थानचे सचिव रवींद्र कर्वे, मिना पाठक, डॉ. आनंद पळसोदकर, आप्पा कोल्हे, राहुल वाठोडकर व श्री अंबादेवी संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते. याच प्रमाणे श्री एकविरा देवी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर होळी दहन झाले. संस्थानचे सचिव चंद्रशेखर व स्वाती कुळकर्णी यांनी पूजन केले. यावेळी अन्य उपस्थित होते.