कृषी, कामगार, वीज कायद्यांची होळी

    दिनांक :28-Mar-2021
|
- किसान संघर्ष समन्वय समितीचे आयोजन
तभा वृत्तसेवा
चांदूर रेल्वे, 
केंद्र सरकारचे नवीन कृषी कायदे, कामगार विषयक कायदे तसेच खाजगीकरणाच्या विरोधात रविवारी सायंकाळी होळी सणानिमित्य चांदूर रेल्वे शहरात गाडगेबाबा मार्केटमधील सीसीएन कार्यालयाजवळ कायद्यांच्या प्रतीची होळी करून केंद्र सरकारविरोधात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला.
 
sdfsd_1  H x W:
 
28 मार्चला होळीचा सण सगळीकडे साजरा करण्यात आला. यामध्ये सायंकाळी मुख्यत्वे होलिका दहन करण्यात आले. मात्र चांदूर रेल्वेत एका ठिकाणी आगळीवेगळी होळी पेटविण्यात आली. यामध्ये तीन कृषी कायदे, कामगार विरोधी कायदे, वीज बिल कायदे आदींच्या प्रति जाळून होळी दहन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारने सपाटा लावलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात सुद्धा निषेध व्यक्त करण्यात आला. कृषी कायदे रद्द झालेच पाहिजे, कामगार विरोधी कायदे रद्द झालेल पाहिजे, आवाज दो हम एक है, खाजगीकरण बंद झालेच पाहिजे आदी घोषणाकरण्यात आल्या. यावेळी अखिल भारतीय किसान संघाचे समन्वय समितीचे विजय रोडगे, देविदास राऊत, विनोद जोशी, नितीन गवळी, मेहमुद हुसेन, प्रा. प्रसेनजित तेलंग, विनोद लहाने, चरण जोल्हे, हरिभाऊ चव्हाण, रामदास कारमोरे, आदींची उपस्थिती होती.