आपने केली सरकारी धोरणांची होळी

    दिनांक :28-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
होलिका दहन म्हणजे समाजातील दुराचार व्यभिचार भ्रष्टाचार वाईट प्रथा परंपरा गोष्टी अनै तिकता,अहंकार, कुडा कचरा जाळने,इत्यादी वाईट प्रवृत्ती नष्ट करणे,आपण आदर्श समाज देश घडविण्याकरिता याचा त्याग करण्याचा संकल्प वर्धा जिल्हा आपच्या वतीने घेण्यात आला . अशी याप्रसंगी ईश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद भोमले, ममता कपूर ,मंगेश शेंडे तुळसीदास वाघमारे प्रकाश डोडानी मयुर राऊत,योगेश ठाकुर खलिद खान ,रवी बाराहाते, गिर्धारी अन्दनी,सुरेश बोरकर,दादा शंभर कर शाहरूख खान,आदी उपस्थित होते.
 
 
app_1  H x W: 0
 
स्थानिक बजाज चौक वर्धा येथे वर्धा जिल्हा आपच्या वतीने राज्य सरकारचे वतीने वाढीव वीज बिल ,शेतकरी व जनतेचे वीज कनेक्शन कापणे ,कोरोणा काळातील वीज बिल माफ न करणे, प्रत्यक्ष शिक्षण बंद असताना पूर्ण शुल्क पालकांकडून वसूल करणे ,उठसूट लॉक डाउनमुळे अर्थव्यवस्थेचे तिन तेरा झाले, जनतेचे बेहाल,जनता बेजार झालीआहे ,केंद्र सरकारचे शेतकरी विधेयक काले कायदे, सिलेंडर पेट्रोल-डिझेल महागाई मध्ये वाढ, दिवसेंदिवस वाढती बेरोजगारी, त्यामुळे युवकांमध्ये असंतोष ,स्पर्धा परीक्षा ,पोलीस भरती शिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ,वरील सर्व बाबींमध्ये राज्य व केंद्र शासनाचे चुकीचे धोरण असल्यामुळे राज्यातील व देशातील जनता, शेतकरी समाजातील जवळ पास सर्वच घटक बेजार झाला आहे ,आज होळी सण प्रसंगी वर्धा जिल्हा आपच्या वतीने वरील सर्व धोरणाची होळी करण्यात आली, लवकरच राज्य व केंद्र सरकारला सुबुद्धी येवो व राज्यातील जनता सुखी संपन्न होवो