चिमुरडीसह तिघींचा विनयभंग

    दिनांक :28-Mar-2021
|
नागपूर,
एका सात वर्षीय चिमुरडीसह तिघींचा विनयभंग केल्याप्रकरणी वाडी, हुडकेश्वर आणि वाठोडा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काचीमेट येथे येथे राहणार्‍या 32 वर्षीय महिलेची मुलगी ही अंगणात खेळत होती. त्याचवेळी एमएच 31 एफई 8524 क्रमांकाचा कारचालक तिच्याजवळ आला. कारचालक आरोपीने त्याच्या मोबाईलमधील अश्लिल छायाचित्रे मुलीला दाखवून तिचा विनयभंग केला. त्याचप्रमाणे तिला अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

ngp_1  H x W: 0 
 
तरुणीचा विनयभंग
ब्रेकअप झाल्यानंतरही एका तरुणीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी पंकज मनोहर तुमाणे (32) रा. टिमकी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पंकज आणि पीडित 29 वर्षीय तरुणी यांच्यात मैत्री होती. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात ब्रेकअप झाला. त्यामुळे तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले. तरीही तो तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. नेहमीच्या या त्रासाला कंटाळून शेवटी तरुणीने पंकजच्या विरोधात हुडकेश्वर पोलिसात तक्रार केली. हॉटेलमध्ये काम करणार्‍या महिलेचा विनयभंग करणार्‍या विशाल लुळाळे (25) याच्यावर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशालचे हॉटेल आहे. त्याच्या हॉटेलमध्ये पीडित 29 वर्षीय महिला काम करीत होती. काही कारणास्तव तिने काम सोडले. तरीही तो तिचा पाठलाग करीत होता. तरुणीच्या भावाने विशालला समजाविण्याचा प्रयत्न केला असता भावालाच शिवीगाळ केली. याप्रकरणी वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.