जिल्ह्यातील कोरोना संकटात वाढ

    दिनांक :28-Mar-2021
|
- रविवारी 439 बाधित, दोघांचा मृत्यू
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नसल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन प्रशासनाचीही चिंता वाढत आहे. मागील महिन्यापर्यंत शंभरी न गाठलेल्या भंडारा जिल्ह्यात रविवारी तब्बल 439 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या 16 हजार 789 झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला. धूळवळसारख्या सणाच्या उत्साहात संयम न दाखविल्यास कोरोनाबाधितांच्या संख्येत अधिक भर पडल्याशिवाय राहणार नाही. रविवारी 1803 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले.
 
 
corona _1  H x
 
त्यापैकी 439 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या आहेत. या कोरोनाबाधित आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 226, मोहाडी 14, तुमसर 28, पवनी 64, लाखनी 60, साकोली 31 व लाखांदूर तालुक्यातील 16 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 1 लाख 73 हजार 66 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 16 हजार 789 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. तर 14 हजार 400 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 16 हजार 789 झाली असून 2052 क्रियाशील रुग्ण आहेत. रविवारी 2 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या 337 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.77 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्यूदर 2 टक्के एवढा आहे.
 
चाकरमाण्यांमुळे अधिक धोका
भंडारा जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांमध्ये भंडारा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. येथील विविध शासकीय कार्यालयांमध्ये बाहेरगावाहून ये-जा करणाèया चाकरमाण्यांची संख्या अधिक आहे. नागपूरसारख्या कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जिल्ह्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी भंडाèयात ये-जा करतात. अशा कर्मचाèयांच्या संपर्कात इतर व्यक्तीही येत असल्याने ते कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत आहेत. यावर वेळीच निर्बंध न घातल्यास भंडारा सुध्दा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्यास वेळ लागणार नाही, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
 
गडेगाव/किन्हीत आढळले 25 कोरोना रुग्ण
लाखनी : तालुक्यातील गडेगाव किन्ही या छोट्या गावात एकाच दिवशी 25 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. लाखनीचे तहसिलदार मल्लीक विराणी यांनी तातडीने गावात भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व आशा वर्करशी चर्चा करून कोरोनाप्रतिबंधात्मक सूचना केल्या. तर साकोली उपविभागीय अधिकाèयांच्या निर्देशानुसार किन्ही/गडेगाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात आले. गावाच्या सिमेवर कठडे व पोस्टर लावून गावबंदी करण्यात आली आहे.