-15 जुगारी अटक
-10 लाखाचा मुद्देमाल जप्त
साखरखेर्डा,
साखरखेर्डा ते लव्हाळा रोडच्या कडेला एका पक्क्या गोठ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर 27 मार्चच्या मध्यरात्री बुलडाणा एलसीबीच्या पथकाने छापा टाकून 16 जुगाछयांना अटक केली तर त्यांच्याकडून 10 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. साखरखेर्डा येथे जुगाराचा मोठा क्लब सुरु असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली व एलसीबी पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांचे आदेशाने 27 मार्चच्या मध्यरात्री पोलीस स्टेशन साखरखेर्डा हद्दीमध्ये गावाजवळ शेतातील पक्क्या खोलीत जुगार सुरु असतांना रात्री 1 वाजता एलसीबीच्या पथकाने धाड टाकून 15 आरोपी अटक केले.
त्यात विष्णू सुधाकर गायकवाड (वय 34 वर्ष), शुभम दिलीपसिंग दैभय्ये (वय 27 वर्ष), रुतीक मोतीराम गायकवाड (वय 19 वर्ष), अमजदखान आमनउल्ला खान (वय 45वर्ष), शे.आरीफ शे.कादर(वय 32 वर्ष) रा.लोणार, प्रविण आसाराम पाझडे (वय 37 वर्ष), अब्रार शाहा हकुम शाहा (वय31 वर्ष), ब्रम्हानंद सुधाकर गायकवाड (वय 25 वर्ष) सर्व राहणार साखरखेर्डा, किसन आत्माराम अवचार (वय 36 वर्ष), श्रीकृष्ण राजू गवई(वय 26 वर्ष) दोघे राहणार वडगांव माळी, विलास रमेश पछहाड(वय 25 वर्ष) रा.सिंदखेड राजा, राजू मुरलीधर दहातोंडे(वय 32 वर्ष) रा.लोणार, ऋषीकेश अभिमन्यू मुळे(वय 19 वर्ष), सुभाष भास्कर मुळे(वय 30 वर्ष) दोघे रा.उदनापूर, संतोष लक्ष्मण आंभोर(वय 29 वर्ष) रा.बोराखेडी व राजू सुकलाल बशिरे(वय 44 वर्ष) रा.अंजनी खुर्द यांचा समावेश आहे.
पोलीस कर्मचारी आताउल्लाह खान यांच्या तक्रारीवर साखरखेर्डा ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपींकडून नगदी 42 हजार 400 रु. 7 मोटर सायकल, एक बोलेरो व 15 मोबाईल असा एवूैण 10 लाख 5 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी पीएसआय प्रदीप आढाव, पीएसआय निलेश शेळके, पीएसआय श्रीकांत जिंदमवार, पोलीस कर्मचारी आताउल्ला खान, श्रीकृष्ण चांदूरकर, गजानन आहेर, पंकज मेहेर, विजय सोनोने, संभाजी आसोलकर, श्रीकांत चिंचोले, गजानन गोरले, वैभव मगर, सुभाष वाघमारे, चालक एएस आय बर्डे व रवी भिसे यांनी कारवाई केली आहे.