पोलिस पाटील कुकुड्डेंचा तंटामुक्ती उपक्रमाला छेद

    दिनांक :28-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
सेलू , 
तालुक्यातील हिवरा (बांगडे) येथे तीन महिन्यांपूर्वी पुरुषोत्तम उराडे या व्यक्तीचा खून झाला होता. 10 वर्षे नवर्‍यापासून दूर राहिलेल्या मंगला उराडे (36) यांनी शुक्रवारी शेत जमिनीवर कब्जा करण्यासाठी प्रयत्न केला. त्या शेत जमिनीच्या वादात समन्वयाची भूमिका न बजावता पोलिस पाटील राजू कुकुड्डे यांनी आपल्यासह बहिणीला हिस्से वाटणीवरून जीवानिशी ठार करण्याची धमकी दिल्याची तक्रार विजय उराडे (महाराज) यांनी सिंदी पोलिसांत दिली आहे.

sdd_1  H x W: 0 
 
मिळालेल्या माहितीनुसार, विजय उराडे आणि परिवारकडे तीन शेत आहे. शुक्रवार 26 रोजी शेत सर्वे क्रमांक 46 मध्ये वखरलेल्या शेतात काम सुरू असतानासकाळी 10.30 वाजता मंगला पुरुषोत्तम उराडे हिला घेऊन विजय उराडेच्या शेतात आला. मंगलाने भासरा विजयला शेतामध्ये हिस्सा पाहिजे असे म्हटले. तिची समजूत घालण्याचा प्रयत्न विजय उराडे करीत होते. गत 10 वर्षात तुम्ही माहेरी होता. शिवाय लहान भाऊ रवींद्र आणि त्याची पत्नी गैरहजर आहे. सर्व वारसदारांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी सूचना केली. पण पोलिस पाटील पद सांभाळणार्‍या राजू कुकुड्डे यांनी दोन्ही पक्षात समेट घडविण्या ऐवजी मंगलाला तिचा हिस्सा द्या असे सुनावले. एवढ्यावरच ते थांबले नाही बहीण लता अवचट व आपल्याला शिविगाळ केली. शिवाय आपण पोलिस पाटील असल्याचे सांगितल्याचे विजय उराडे यांनी सांगितले. त्याच्या या हस्तक्षेपामुळे महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेचे सचिवपद सांभाळणार्‍या प्रतिमेला तडा गेल्याचा आरोप विजय उराडे यांनी केला. या प्रकरणाची पोलिसात तक्रार दिली असता जमादार प्रकाश मेद यांनी पोलिस पाटील यांची बाजू घेत पोलीस पाटील असे करू शकत नाही असे म्हणूनत तक्रार न घेता आधी एक तास बसून ठेवल्याचा आरोप उराडे यांनी केला. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा विजय उराडे यांनी दिला आहे.
 
 
मला जावेदने शेतात जाण्यास सांगितले
 
सदर प्रकाराबाबत पोलिस पाटील राजू कुकुड्डे सोबत संपर्क केला असता, विजय उराडे यांच्या शेतात जाण्याकरिता मला जावेद धामियाचा फोन आला होता. त्यामुळे आपण विजय उराडे व मंगला उराडे यांचा वाद सोडवण्याकरिता गेलो होतो. आपण कुणालाही शिवीगाळ अथवा धमकी दिली नाही, असे त्यांनी सांगितले.