यवतमाळ अर्बन बँकेने पंतप्रधान जीवनज्योती

    दिनांक :28-Mar-2021
|
- विमा योजनेंतर्गत तिघांच्या वारसांना मिळवून दिला लाभ
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
यवतमाळ अर्बन बँकेत खाते असणार्‍या ग्राहकांना मा पंतप्रधान जीवनज्योती विमा काढण्याबाबत विनंती करण्यात येऊन प्रत्येक शाखेत दर्शनी भागात याबाबत फलक लावण्यात आले होते. बहुतांश ग्राहकांनी याबाबत आधारकार्ड व विहित नमुन्यात अर्ज केले अशा व्यक्तींचा मृत्यू झाला असे खाते तपासून त्यांचे वारसांना दोन लाख रुपये विमा रक्कम अनेक खातेदाराच्या वारसांना देण्यात आली आहे.

yt_1  H x W: 0  
 
फेब्रुवारी महिन्यात तीन खातेदारांच्या वारसांना नुकतेच धनादेश देण्यात आले. मृत्यू पावलेले खातेदार दीपक केने, नंदू बंसपाल, मानसी पानसे यांच्या वारसांना 2 लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. याबाबत मार्केटिंग विभागाचे सहायक सरव्यवस्थापक अनूप चमेडिया, शैलेश इनामदार, संतोष मुत्यलवार, संतोष भोयर, योगेश तिखिले या चमूने पाठपुरावा करून केवळ दोन महिन्यांत वारसांच्या खात्यात जमा केले. याबाबत बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, उपाध्यक्ष आशिष उत्तरवार व संचालकांनी मार्केटिंग टीमचे अभिनंदन केले. यवतमाळ अर्बन बँकेतील ग्राहकाला जिवंतपणी जगण्याचा आधार देते व मृत्युपश्चात त्यांच्या कुटूंबाला विम्याचा आधार देते, अशी माहिती मार्केटिंग विभागाचे अधिकारी प्रसाद नावलेकर यांनी दिली.