आ.गायकवाड यांच्या प्रयत्नाने देव्हारीचे पुर्नवसन मार्गी

    दिनांक :28-Mar-2021
|
बुलडाणा,
ज्ञानगंगा अभयारण्यामधील देव्हारी गावाचे पूनर्वसन 1990 मध्ये करण्याचे शासनाने जाहीर केले. परंतू देव्हारी पूनर्वसन करण्यास कोणत्याच प्रतिनिधीने साथ दिली नाही. परंतू आ.संजय गायकवाड यांनी देव्हारी ग्रामस्थांच्या समस्या व गरजा लक्षात घेऊन 57 कोटी रुपये मंजूर करुन आणले आहे. या कामी तत्पर मदत केल्याबद्दल ग्रामस्थांनी आ.गायकवाड यांचा त्यांच्या कार्यालयात जाऊन सत्कार केला.
 
bul_1  H x W: 0
 
आमदारांचे समर्थक श्रीधर अंभोरे रा.देव्हारी यांनी वारंवार आ.गायकवाड यांच्याकडे देव्हारी ग्रामस्थांसह विनंती केली व 31 वर्षांपासून रखडलेले देव्हारी गावाचे पूनर्वसन मार्गी लावले. म्हणून देव्हारी येथील श्रीधर अंभोरे, बुध्देश्वर हिवाळे, दिलीप पवार, सोपान भारसाखळे, भारत हिवाळे, बबन हिवाळे, दिनकर हिवाळे, नंदकिशोर गवई, पुंडलीक वानखेडे, संजय हिवाळे, निंबाजी गवळी, अरुण हिवाळे यांनी आभार मानून आ.संजय गायकवाड यांचे स्वागत केले.