फूल, प्रसाद विक्रीची दुकाने 2 दिवस बंद

    दिनांक :28-Mar-2021
|
बुलडाणा, 
तालुक्यातील पिंपळगांव सराई गावा जवळ हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह असुन देशभरातुन लाखो भाविक सैलानी येथे वार्षिक यात्रा उत्सवात येतात. दरवर्षी होळी दहनने सुरु होणारी यात्रा या वर्षी ही जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द केली असून 27 व 28 मार्च रोजी दरगाह परिसरातील फूल, प्रसादची दुकाने बंद उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांच्या आदेशाने बंद ठेवण्यात आली.

bul_1  H x W: 0 
 
जिल्हाधीकारी एस.रामामूर्ति यांच्या आदेशाने तत्पूर्वीच सैलानी बाबाची यात्रा या वर्षी रद्द करण्यात आली होती. होळी दहनने सुरु होणारी या यात्रेत सर्वधर्मीय लोक येतात. मागील वर्षी सुद्धा कोरोनामुळे ऐन वेळेवर ही यात्रा रद्द केल्याने अनेक भाविकांना प्रशासनाने परतावून लावले होते व त्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. यावर्षी जिल्हा प्रशासनाने तत्पूर्वीच उपाययोजना केले होत्या. त्याप्रमाणे सैलानीकडे येणार्‍या सर्व मार्गावर नाकाबंदी करण्यात येउन पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व गर्दी टाळण्यासाठी 27 व 28 मार्च या 2 दिवशी सैलानी बाबा दरगाह परिसरातील फूल व प्रसादचे सर्व दुकाने बंद ठेवण्यात आले.