जुना भाजी बाजारातील दुकानांना भीषण आग

    दिनांक :28-Mar-2021
|
- नुकसानग्रस्तांना शासनाने मदत द्यावी- आमदार गोवर्धन शर्मा
अकोला,
येथील जुना भाजी बाजार परिसरात असलेल्या सिंधी मार्केटमध्ये रविवार 28 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. रात्रीची वेळ असल्याने जीवितहानी झाली नाही; मात्र या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.

akola_1  H x W: 
 
पहाटे तीन वाजता जुना भाजी बाजार मधील नमकीन मार्केट येथील शिवगंगा नमकीन सेंटरला आग लागून त्यालगतची आणखी पाच दुकाने या आगीत जळाली. अमर कुकरेजा व सुरेश कुकरेजा यांच्या दुकानाला आग लागली. पहाटे तीन वाजता लागलेली आग सकाळी दहा वाजेपर्यंत विजविण्याचे प्रयत्न मनपाच्या अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी केले आमदार गोवर्धन शर्मा यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व कुकरेजा, सुरेका, रांदड परिवाराची भेट घेऊन व नुकसानीची माहिती घेऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासंबंधी आश्वासन दिले. तसेच प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करावा असे निर्देश दिले.यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक गिरीश जोशी, किशोर आलिमचंदानी, हिरा कृपलानी, ब्रह्मानंद वालेच्छा, अजय शर्मा , प्रकाश घोगलिया, सूरज भगेवार , अक्षय जोशी, प्रदीप रांदड हरिभाऊ काळे आदी उपस्थित होते