संचारबंदीत उवतरला खाकीतील देवदूत

    दिनांक :28-Mar-2021
|
- अमोल इंगोलेने दिले मनोरुग्नाला जेवण
- राजेंद्र खंडारे
तळेगाव (श्या.पंत), 
जिल्ह्यात काल 27 मार्च रोजी रात्री आठ वाजतापासून संचारबंदी लागू झाली. या संचारबंदीत अनेकांची होरपळ होत असली तरी घरी जाऊन त्यांनी दोन वेळचे जेवन मिळते. मात्र, येथे रस्त्यावर फिरणार्‍या दोन मनोरुग्णांचे संचारबंदी मुळे जेवणाचे वांदे झाले. दोन घासाच्या शोधात असलेल्या दोन्ही मनोरुग्णांसाठी खाकीतील देवदूर अवतरला. संचारबंदीत कर्तव्यावर असलेल्या पोलिस शिपायाने माणुकीचा धर्म दाखवत स्वत:साठी आणलेला जेवनाचा डब्बा उघडून त्या दोन्ही मनोरुग्णांची भूक भागवली. जिल्ह्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीचा तळेगावातही परिणाम झाला. गाव पूर्णपणे बंद झाले आहे. गावात अनेक दिवसांपासून दोन मनोरुग्ण आहेत.

wa_1  H x W: 0  
 
सकाळ सायंकाळी ते हॉटेलमधुन जे मिळेल ते खाऊन आपला दिवस काढतात. रात्रीपासून संचारबंदी लागल्याने त्यांना जेवन मिळणे कठीण झाल्याने पोटाला काही तरी आधार मिळावा यासाठी ते दोघेही वनवन भटकत होते. त्यांचे भटकने पोलिस कर्मचारी अमोल इंगोले यांच्या लक्षात येताच त्यांनी जेवणाचे दोन डब्बे व थंड पाणी स्वतःच्या व्हॅनमध्ये टाकून चक्क त्या दोन मनोरुग्णांच्या मागे निघाले. एक मनोरुग्ण काही अंतरावर सापडला. त्याला पाणी आणि जेवण देऊन पुढील प्रवासात दुसर्‍या मनोरुग्णांच्या शोधात निघाले. उदांपुलाच्या बाजूने मनोरुग्ण आढळून आला. त्यावेळी त्या मनोरुग्णाने खडका फाट्याजवळ जेवण करण्याची इच्छा व्यक्त केली असता पोलिस दादांनी स्वतःच्या व्हॅनमध्ये त्या मनोरुग्णाला बसवून फाट्यावर नेले आणि तिथे त्याला जेवण दिले. आपण बर्‍याच वेळापासून त्या दोन्ही मनोरुग्णांची जेवनासाठीची तळमळ बघत होतो. काही वेळाने त्यांना जेवन दिले पाहिजे असे आपल्याला वाटले. त्यानंतर दोघांनाही जेवन देण्याचा निर्णय घेता आणि वर्दीचा वगैरे विचार न करता त्यांच्यामागे निघालो. पोटभर जेवन मिळाल्याचा आनंद आपण त्यांच्या चेहर्‍यावर बघितल्याने आपल्याला वेगळी उर्जा मिळाली. आता भविष्यात उपाशीपोटी कोणी झोपणार नाही यासाठी आपले प्रयत्न असतील, असे खाकीवर्दीतील माणुसकी दाखवणारे पोलिस कर्मचारी अमोल इंगोले यांनी सांगितले.