भाजपा शहर मंडळाची प्रभाग सभा

    दिनांक :28-Mar-2021
|
वाशीम,  
भारतीय जनता पार्टी वाशीम शहराच्या वतीने प्रभाग निहाय सभेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीने प्रभाग क्रमांक सहा, सात, आठ, नऊ या प्रभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदेशाचे नेते राजू पाटील राजे उपस्थित होते. तर मार्गदर्शक म्हणून माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कोरोना काळामध्ये केलेले कार्य, आत्मनिर्भर भारत व आदी निर्णयाचा भाजपाच्या वतीने अभिनंदन प्रस्ताव सादर करण्यात आला. तसेच महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध प्रस्ताव सादर करण्यात आला.
 
 
done_1  H x W:
 
गत सव्वा वर्षात महाविकास आघाडीतर्फे राज्यातील जनतेची दिशाभूल करण्यात आली. महिलांवर होणारे अत्याचार, शेतकर्‍यांचे होणारे हाल यासारख्या अनेक बाबी निषेध प्रस्तावात नमुद आहे. यावेळी जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी भानुप्रतापसिंह ठाकूर, मिठु शर्मा, नागेश घोपे, राहुल तुपसांडे, गणेश खंडाळकर, सुनील तापडीया, आशाताई खटके, भीमकुमार जीवनानी, नवीन शर्मा व आदी उपस्थित होते.