लग्नाचा परत येताना काळाचा घाला

    दिनांक :28-Mar-2021
|
- बापलेक जागीच ठार
वाशीम,
नागपूर - औरंगाबाद महामार्गावर शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिंप्री सरहद्द नजीक घडलेल्या अपघातामध्ये पिता आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, नंदकिशोर दत्तात्रय शिगणे (वय ४६ ) रा.शेदुरजना ता. सिदंखेड राजा जि.बुलढाणा यांनी समक्ष पोलीस स्टेशनला हजर येवून जबानी रिपोर्ट दिला की, त्यांची पुतनी शिवकन्या अशोक खेडेकर रा.शेदुरजना हिच्या लग्नाचा बस्ता घेण्यासाठी उषा नंदकिशोर शिंगणे, अशोक एकनाथ शिंगणे, झानेश्वर भास्कर शिंगणे, धनंजय अशोक शिंगणे, दिनकर एकनाथ शिंगणे, कल्यानी दिनकर शिंगणे, शिवकन्या अशोक शिंगने रा.शेदुरजना अमरावती येथे २७ मार्च रोजी सकाळी ५ वाजता एम एच ११ सी डब्ल्यू ४३६ या क्रमांकाच्या कारने गेले होते.
 

ace_1  H x W: 0
 
बस्ता घेवुन सांयकाळी घरी येत असताना सदर गाडीला रात्री अंदाजे साडेदहा वाजता चे सुमारास मालेगाव ते डोणगाव रोडवर पिपरी सरहद जवळ कन्टेनर क्र एम एच १७ बी व्ही ६४८९ ने डोणगाव कडुन मालेगाव कड़े जात असताना त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणाने चालवुन गाडीला जोराने समोरासमोर धडक दिली. त्यामुळे उषा शिंगणे यांचे दोन्ही हाताचे बोटाला मार लागला,व ड्रायव्हरचे उजवे बाजुला मार लागला व दिनकर एकनाथ शिंगणे व कल्यानी दिनकर शिंगणे हे घटनास्थळी ठार झाले.