जिल्ह्यात दोन दिवसात 1244 बाधित, दोघांचा मृत्यू

    दिनांक :30-Mar-2021
|
बुलडाणा,
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3391 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2665 अहवाल कोरोना नकारात्मक असून 726 अहवाल 29 मार्च रोजी बाधित प्राप्त आले आहे. प्राप्त बाधित अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 576 व जलद तपासणीतील 150 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 891 तर जलद तपासणीमधील 1794 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 2665 अहवाल नकारात्मक आहेत.
 
buk_1  H x W: 0
 
आज 30 मार्च रोजी तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1956 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1438 अहवाल कोरोना नकारात्मक असून 518 अहवाल 30 बाधित प्राप्त आले आहे. प्राप्त बाधित अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 430 व रॅपीड टेस्टमधील 88 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 669 तर शीघ्र तपासणीमधील 769 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 1438 अहवाल नकारात्मक आहेत. गेल्या दोन दिवसांत 1244 कोरोनाबाधितांची संख्या असून दोघांचा मृत्यू झाला आहे. मलकापूर येथील 86 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
 
 
जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5755 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 255 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 214790 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 37114 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 31104 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 5755 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 255 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.