चिखली न.प.हद्दवाढ प्रस्तावास मान्यता, आ.श्वेता महाले यांच्या प्रयत्नांना यश

    दिनांक :30-Mar-2021
|
चिखली, 
अनेक दिवसांपासून रखडून पडलेल्या चिखली नगरपरिषद हद्दवाढ प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता दिल्याने आ.श्वेता महाले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. त्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 30 मार्च रोजी चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढी बाबत उपसचिव सतीश मुंडे यांच्या सहीने घोषणा केली आहे. शासन निर्णयानुसार मंत्रालय मुंबई 30 मार्च अन्वये चिखली नगरपरिषद हद्दवाढीस मान्यता दिलेली आहे.
 
wda_1  H x W: 0
 
अधिवेशन काळात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता देण्याचे लेखी उत्तर दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून परिपुर्ण प्रस्ताव नसल्याने रखडून पडलेल्या चिखली नगरपरिषदेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावातील त्रुटींचा सततचा पाठपुरावा करून त्रुटी पुर्तता पूर्ण झाल्याने चिखली नगरपालिका हद्दवाढीचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर केल्याचे नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांनी आ सौ श्वेताताई महाले यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिले आहे.
चौकट घेणे
 
 
शहराच्या विकासाला गती मिळणार
 
चिखली शहराची हद्दवाढ मंजूर झाल्याने झपाट्याने वाढत असलेल्या चिखली शहरातील वाढीव भागात आता नागरी सुविधा देण्यासाठी सोईचे होणार आहे. हद्दवाढ मंजूर झालेल्या भाग ग्रामीण व शहरी असा दोन्ही असल्याने आणि सदर नागरी वस्ती ही चिखली शहरात येत नसल्याने पाणीपुरवठा , स्वच्छता , दिवाबत्ती ,रस्ते अशा मूलभूत सुविधा देता येत नव्हत्या . आता हद्दवाढ झाल्याने वाढीव भागात नागरी सुविधा देण्याच्या अडचणी दूर झाल्या आहे. चिखली शहराची हद्दवाढ झाल्याने सफाई कामगार यांची पदे सुद्धा वाढणार आहे.
 
 
आ.श्वेता महाले यांनी 10 मार्च 2020 रोजी नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे तथा प्रधान सचिव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चिखली नगर परिषदेच्या हद्दवाढीस मान्यता देणेबाबत पत्र दिलेले होते. तेव्हापासून आ.श्वेता महाले यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रस्तावाची हालचाल सुरु झाल्याने त्यावर कार्यासन अधिकारी, नगरविकास यांनी दि. 11/09/2020 रोजी दिलेल्या पत्रानुसार चिखली नगर परिषदेच्या वतीने त्रुट्याची पूर्तता केलेली आहे. तसेच आ.श्वेता महाले यांनी याबाबत विधीमंडळामध्ये तारांकित प्रश्न व कपात सूचनेच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष वेधले होते.