संचारबंदीचा आदेशात सेलू पोलिसांची चांदी?

    दिनांक :30-Mar-2021
|
- मांस विक्रेत्यांकडून मटनही अन् दंंडही
तभा वृत्तसेवा
सेलू, 
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळविण्याकरिता राज्य शासनासह जिल्हा प्रशासन सतर्क आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला संधीत रूपांतर करीत तिला कोंबडी समजून स्थानिक पोलिसांनी काल धुलिवंदनाला मांस विक्रेत्यांकडून जोरदार दंड वसुल केल्याने जिल्हाधिकार्‍यांचा 24 तारखेचा आदेश म्हणजे सेलू पोलिसाकरिता सोन्याची अंडी देणारी कोंबडीच ठरली.

qwdw_1  H x W:  
 
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकारी देशभ्रतार यांच्या 24 मार्चच्या पत्रानुसार संपुर्ण जिल्ह्यात 27 रोजी रात्री 8 वाजतापासून तर 30 मार्चच्या सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश दिलेला होता. परंतु, या कालावधीत वैद्यकीय सेवा वगळता ईतर सर्व आस्थापनं बंदी ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच तहसीलदारांच्या मार्गदर्शनात नगर पालिका, नगर पंचायत तथा ग्रामपंचायत येथील प्रशासकीय प्रमुखांना संचारबंदी यशस्वीतेकरिता कर्तव्य बजावणे अपेक्षित होते. त्यांना सहकार्य पोलिस प्रशासन करेल असे स्पष्ट आदेश परिपत्रकात होते. परंतु, 29 रोजी संचारबंदीचा कालमर्यादेतील धुलिवंदनाचा दिवस असून या दिवशी चक्क ठाणेदाराच्या उपस्थितीत येथीलच एका वाहतुक पोलिसामार्फत सेलू शहरातील मासं विक्रीचे दुकानं चालू ठेवायचे असल्यास दंडा व्यतिरिक्त वसुली केली. परिणामतः 200 रुपये किलोचे चिकन तीनशेवर तर मटन 600 ऐवजी 750 ला विक्री झाली. ज्या वाहतूक विभागातील कर्मचार्‍यावर वसुलीची जबाबदारी सोपविली त्याने नोव्हेंबर महिण्यात स्वतःचा वाढदिवसही खाकीचा धाक दाखवून फुकटच्या चिकणची मेजवाणी दिल्याचे काही मासं विक्रेत्यांनी सांगितले. कोरोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात सहकार्य करण्याऐवजी संचारबंदीच्या आदेशाचे सोने करून वसुली अभियान राबविण्यात आल्याने संचारबंदीचा आदेश म्हणजे वसुलीकरिता लावलेले बुजगावने तर नाही ना असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 60 तासाच्या संचारबंदीचे औचित्य साधून मांस विक्रेत्यांकडून दंड, चार किलो मटनासह एक पाव चिकण व एक अंडाकरीवर ताव मारल्याची कथा सेलूत चांगलीच रंगली आहे.