कंटेनर - कार च्या अपघातात बापलेक जागीच ठार

    दिनांक :30-Mar-2021
|
- लग्नाचा बस्ता घेऊन परत येताना काळाचा घाला
शिरपूर जैन,
नागपूर - औरंगाबाद महामार्गावर शिरपूर पोलिस स्टेशन हद्दीतील पिंप्री सरहद्द नजीक एक अत्यंत हृदय द्रावक अपघात घडला असून, कंटेनर - कार अपघातात पिता आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे.

was_1  H x W: 0 
 
पोलिस स्टेशनकडुन प्राप्त माहिती नुसार नंदकिशोर दत्तात्रय शिगणे (वय 46) रा. शेदुरजना ता. सिदंखेड राजा जि.बुलढाणा यांनी समक्ष पोलिस स्टेशनला हजर येवून जबानी रिपोर्ट दिला की, त्यांची पुतनी शिवकन्या अशोक खेडेकर रा.शेदरजना हिचे लग्ना चा बस्ता घेण्यासाठी उषा नंदकिशोर शिंगणे, अशोक एकनाथ शिंगणे, झानेश्‍वर भास्कर शिंगणे, धनंजय अशोक शिंगणे, दिनकर एकनाथ शिंगणे, कु कल्यानी दिनकर शिंगणे, शिवकन्या अशोक शिंगने रा. शेदुरजना हे अमरावती येथे 27 मार्च 2021 रोजी सकाळी 5 वाजता चालक योगेश बबन इधारे हे गाडी कार क्र. एमएच 11 सीडब्ल्यू 0436 या चारचाकी वाहनाने गेले होते. बस्ता घेवुन सांयकाळी घरी येण्यासाठी अमरावती येथुन अंदाजे 6 वाजता निघाले होते. सदर गाडीला रात्री अंदाजे 10.30 वा चे सुमारास मालेगांव ते डोणगांव रोडवर पिपरी सरहद जवळ कंटेनर क्र एमएच 17 बीव्ही 6489 मे डोणगांव कडुन मालेगांव कड़े जात असतांना त्याचे ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणाने चालवुन गाडीला जोराने समोरासमोर धडक दिली. त्यामुळे उषा शिंगणे यांचे दोन्ही हाताचे बोटाला मार लागला व ड्रायव्हरचे उजवे बाजुला मार लागला व दिनकर एकनाथ शिंगणे (वय 44) व कल्याणी दिनकर शिंगणे (वय 18) हे जागेवरच मरण पावले आहे.