कोरोनाची तपासणी व लसीकरण करून घ्या

    दिनांक :30-Mar-2021
|
- प्रशासनाचे कळकळीचे आवाहन
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव हा झपाट्याने वाढत असून काळजी घेणे खूपच आवश्यक झाले आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार कडक निर्बंध लावण्यात आले असून कोराना टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, अशी सूचना देण्यात आली. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, तहसीलदार सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनात तपासणी केंद्र सुरू करण्यात आले. ही यंत्रणा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय मांगे, वैद्यकीय निरीक्षक अनिल गोकुळे यांच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागात तपासणी केंद्र सुरू झाले असून रामगाव (रामेश्वर), कुंभारकिन्ही, नखेगाव या ठिकाणी तपासणी केंद्र उघडण्यात आले आहे.

tty_1  H x W: 0 
 
जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार रोज 600 तपासणी करावी, तसेच 400 नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. याकरिता गावातील नागरिकांनी प्रशासनाच्या योजनेस सहकार्य करावे. तपासणी व लसीकरणाकरिता सामाजिक संघटेनेने पुढाकार घेऊन नागरिकांना प्रोत्साहित करावे असे कळकळीचे आवाहन उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे व तहसीलदार सुभाष जाधव यांनी केले. तसेच 1 एप्रिलपासून 45 वर्षार्ंवरील नागरिकांना लस देण्यात येईल असे तहसिलदारांनी सांगितले. तपासणी केंद्रावर प्रशासकीय अधिकारी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय मांगे, वैद्यकीय निरीक्षक अनिल गोकुळे, संतोष कोरडे, शरद पवार, सुनील दुधे, प्रदीप माहुरे, सागर चक्रे तथा परिचारिका परिश्रम घेताना दिसत आहे.