दोन गटात हाणामारी; उपचारा दरम्यान एकाचा मृत्यृ

    दिनांक :30-Mar-2021
|
कारंजा लाड्र,
तालुक्यातील कामठवाडा येथे एका कुटुंबाच्या घरच्या लोंखडी दरवाज्याला दगड का मारला यावरून दोन गटात वाद होउन हाणामारी झाल्याची घटना 29 मार्च रोजी सांयकाळी 6 वाजताच्या दरम्यान कामठावाडा येथे घडली. या घटनेत एक जखमी होउन उपचारा दरम्यान मृत्यृ झाला. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी 7 आरोपीला अटक केली आहे.

dfgdf_1  H x W: 
 
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार अमोल जगदेव जाधव यांचे कारंजा ग्रामीण पोलीसांत फिर्याद दिली की, माझया घराच्या लोखंडी गेटला दिलीप उदयसिंग राठोड यांने दगड फेकुन मारला यावेळी माझे वडील जगदीश बस्सी जाधव (वय 65) हे घराबाहेर आले. यावेळी आरोपी दिलीप उदयसिंग राठोड याला दगड का फेकुन मारला असे विचारला असता. त्याने माझया वडीलासोबत वादावादी सुरू करून गैरकायदयाची मंडळी जमा करून माझ्या वडीलाला मारहाण केली. यामध्ये वडील जखमी होउन त्यांना उपचारार्थ अकोला येथे भरती केले. उपचारा दरम्यान जगदीश बस्सी जाधव यांचा उपचारा दरम्यान 30 मार्च रोजी मृत्यृ झाला. यावेळी ग्रामीण पोलिसांनी आरोपी दिलीप उदयसिंग राठोड, देवराज राठोड, अजय मधुकर राठोड, शुभम शेषराव चव्हान, श्रावण मधुकर राठोड, ज्ञानेदेव हरींचद्र राठोड, सदासिव हरीचंद्र राठोड रा कामठवाडा यांच्या विरूध्द कलम 302, 307 324, 323, 243,147 नुसार गुन्हा दाखल केला असून, घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन धंधर व पोलीस उपनिरीक्षक वानखडे करीत आहे.