होळीच्या प्रसादाची समाजमाध्यमांवर धुम

    दिनांक :30-Mar-2021
|
- वरूड परिसरातील घटना
तभा वृत्तसेवा
वर्धा,
जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश असताना काही तरुण धुळवळीचा मनमुराद आनंद लुटत असताना सेवाग्राम पोलिसांच्या नजरेत पडले आणि मिळालेल्या प्रसादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालू लागला. फेसबुक व्हॉट्सअपच्या स्टेटसला असलेले हा व्हिडीओ कोरोनाचे गांभीर्य सांगत त्या पोलिस दादांच्या कर्त्याव्याचा आदर करणारा ठरला.

wwf_1  H x W: 0 
 
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या पाहून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी 27 रोजी 8 ते मंगळवार 30 रोजी 8 वाजेपर्यंत 60 तासाची संचारबंदी लावली होती. अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, जमाव करु नये असे सक्त आदेश काढले असताना सेवाग्राम मार्गावर असलेल्या वरुड येथील गुरूकृपा पोलिस सोसायटीत विजय देवगीरकर यांनी आपल्या इलेक्ट्रॉनिक दुरूस्तीच्या दुकानासमोर परिसरातील युवकांना धुळवळीचा आनंद लुटण्यासाठी साऊंड सिस्टमची व्यवस्था करून दिली होती. पोर एकमेकाला रंग लावत पाईपने पाण्याचा अपव्यय सुरू होता. दरम्यान, पोलिसांच्या प्रवेशाने दानादान उडाली. चौकशी अंती संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी देवगीरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांच्या मार्गदर्शनात रवि रामटेके, विमलनयन तिवारी, विलास वायगोकार गृहरक्षक अरविंद लाडे आदींनी केली.