टाळेबंदीतील विजबिल माफीसाठी मनसेचे भिक मांगो आंदोलन

    दिनांक :30-Mar-2021
|
- जमा केलेली रक्कम केली महावितरणला सुपुर्द
वाशीम,
मागील वर्षी सलग तीन महिने झालेल्या टाळेबंदी काळात लोकांचा रोजगार हिरावून घेतला गेला असतांना महवितरणने दिलेले भरमसाट विजबिले माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 30 मार्च रोजी शहरात भिक मांगो आंदोलन राबविण्यात आले. या आंदोलनातून जमा झालेली 650 रुपयाची रक्कम विज वितरण कंपनीच्या खात्यात जमा करुन रितसर पावती घेण्यात आली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात महावितरणला निवेदन देवून विजबिल माफीची मागणी करण्यात आली.
 
wd_1  H x W: 0
 
निवेदनात नमूद आहे की, टाळेबंदी कालावधीतील नागरीकांना भरमसाठ आलेली विजबिले माफ करुन दिलासा देण्यात या मागणीसाठी मनसेच्या वतीने सातत्याने निवेदने व आंदोलन करण्यात येत आहेत. 26 मार्च रोजी यासंदर्भात मुख्यमंत्री, उर्जामंत्री व विज नियामक आयोगाला देवून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. विज बिल माफीसंदर्भात उर्जामंत्री ना. नितीन राऊत यांनी कोरडे आश्वासन देवून नंतर घुमजाव केले व लोकांकडून सक्तीने विजबिल वसुलीचे आदेश दिले. यासंदर्भात मनसेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेण्यात येवून 30 मार्च रोजी महावितरणला विजबिल माफीसाठी नागरीकांकडून सहकार्य म्हणून भिक मांगो आंदोलन राबविण्यात आले. या आंदोलनातून जमा झालेली 650 रुपयाची रक्कम महावितरण कार्यालयातील अधिकार्यांच्या सुपुर्द करुन रितसर शासकीय पावती घेण्यात आली. या आंदोलनात मनसेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.